Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Politics: डोंबिवलीत ठाकरे गट - भाजपमध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

Satish Kengar

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

डोंबिवली स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणावरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात करण्यात आलेले सुशोभीकरन गणपतीत जसे डेकोरेशन केले जाते, तसे करण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अर्धवट कामाचे भूमीपूजन लोकार्पण केले जात असल्याची टिका ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी भाजपवर केली.

तर भाजपने देखील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. दीपेश म्हात्रे यांचा स्थायी स्वभाव भ्रष्टाचाराचा असल्याने त्यांंना सर्व ठिकाणी भ्रष्टाचार दिसत आहे. त्यांनी डोंबिवलीसाठी काय काम केले हे त्यांनी दाखवावे, अशी टिका भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी केली आहे.

डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभिकरण करण्यात आले असून स्टेशनच्या प्रवेशद्वारावर भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्या प्रवेशद्वारावर विविध कामगिरी करत डोंबिवली शहराचे नाव साता समुद्रापार नेणाऱ्या व्यक्तीची भिंती चित्रांच्या माध्यमातून लावण्यात आली आहे.

दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या सुशोभिकरणाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर उपस्थित होते. नागरीकांनी याकामाची प्रशंसा केली आहे. या सुशोभिकरणाच्या कामावरुन आत्ता राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी आज स्टेशन परिसरात या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान या कामविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत भाजपला टिकेचे लक्ष्य केले.

दीपेश म्हात्रे म्हणाले की, नुकतेच दोन दिवसापूर्वी या कामाचे उद्घाटन केले आहे. त्याची लगेच दुरावस्था झाली आहे. गणपतीला डेकोरेशन केले जाते. तशा प्रकारचे हे सुशोभिकरणाचे काम झाले आहे. काम निकृष्ट दर्जाचे आहे. हे सुभोकरण एक प्रकारे डाेंबिवलीकरांच्या माथी मारले असल्याची टिका केली आहे. म्हात्रे यांच्या टिकेला लगेचच भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सडेताेड उत्तर दिले आहे. जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले की, दीपेश म्हात्रे यांचा स्थायी स्वभाव भ्रष्टाचाराचा आहे. त्यामुळे त्यांनाा सगळयाच कामात भ्रष्टाचार दिसतो. डोंबिवलीसाठी त्यांनी काय काम केले हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही म्हात्रे यांना सूर्यवंशी यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP : राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतीकारांनी बाबा सिद्धिकींना वाहिली श्रद्धांजली

IND W vs AUS W: हरमनप्रीत एकटी लढली! सामना निसटला, मात्र अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी; पाहा समीकरण

Baba Siddique Funeral: बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये जरांगे-भुजबळ समर्थक आमनेसामने

Baba Siddique : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरा आरोपीही अटकेत, कोण आहे शुबू लोणकर? वाचा...

SCROLL FOR NEXT