Baba Siddique : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरा आरोपीही अटकेत, कोण आहे शुबू लोणकर? वाचा...

Baba Siddique Death Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारणारी पोस्ट समोर आली आहे. ही पोस्ट करणारा शुभम लोणकर याला काही महिन्यांपूर्वी अकोल्यातून अवैध शस्त्रांसह अटक झाली होती. तपासात लोणकर याचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचं समोर आलं होतं.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरा आरोपीही अटकेत, कोण आहे शुबू लोणकर? वाचा...
Baba SiddiqueSaam Tv
Published On

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर जसजसा तपास पुढे जातोय. तशी धक्कादायक माहिती समोर येतेय. या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती आहे. तसेच ज्या हल्लेखोरांना अटक झाली होती. ते बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची सुत्रांची माहिती मिळतेय. अशात या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. प्रवीण लोणकर नावाच्या इसमाला पुण्यावरून अटक करण्यात आली आहे. 28 वर्षीय प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर यांचा भाऊ आहे. प्रवीण लोणकर हा गटातील एक सूत्रधार, असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने शुभम सोबत धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना सामील केलं.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरा आरोपीही अटकेत, कोण आहे शुबू लोणकर? वाचा...
Baba Siddique: बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट कसा शिजला? Y सिक्युरिटी भेदून हत्या? समोर आली A टू Z माहिती

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्विकारणारी फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. शुबू लोणकर महाराष्ट्र या नावानं पोस्ट आहे. हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झालीय. फेकबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास केला जातं आहे. आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांचे पथक अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गांवात लोणकर याच्या घरी पोहोचले होते. मात्र त्याच्या घराला कुलूप होतं.

कोण आहे शुबू लोणकर?

शुभम लोणकर हा अकोला पोलिसांच्या रडारवर होता. शुभम लोणकर हा अकोल्यातील अकोट येथील रहिवासी आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी त्याला शस्त्रास्त्र तस्करीच्या आरोपाखाली पुण्यातून अटक केली होती. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याची जामिनावर सुटका झाली होती. शुभमचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असल्याचे उघड झालंय.लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरा आरोपीही अटकेत, कोण आहे शुबू लोणकर? वाचा...
Baba Siddique Death : आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; पोलिसांना सापडली २८ काडतुसे, सिद्धिकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी कोण?

सिद्दिकींच्या हत्येचे धागेदोरे अकोल्यापर्यंत पोहचल्यानं महाराष्ट्र पोलिस सतर्क झाले आहेत. लोणकरला ताब्यात घेतल्यावरच हत्येच्या हेतूवर आणखी प्रकाश पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com