Central Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway Accident: मध्य रेल्वेवर आजचा दिवस ठरला अपघाताचा, गेल्या २४ तासांत ४ प्रवाशांचा अपघातात मृत्यू

dombivli train accident today: डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज बुधवारचा दिवस घातपाताचा दिवस ठरला आहे. गेल्या २४ तासांत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Central Railway Accident News:

डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज बुधवारचा दिवस घातपाताचा दिवस ठरला आहे. गेल्या २४ तासांत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशाचा मृत्यू?

डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात सत्र सुरुच असल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या अपघातात ४ जणांचा मृ्त्यू झाला आहे. यातील अपघातातील एका मृतदेहाची ओळख पटली आहे. तर तिघांच्या वारसांचा शोध सुरू आहे, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे. यामधील दोघांचा मृत्यू दरवाजात उभे असताना बाजूच्या खांबांचा फटका लागून किंवा लोकलमधील गर्दीमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

...अन् महिलेने जीव गमावला

पहिल्या घटनेत ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान रात्री सव्वा बाराच्या सुमारास एका 50 वर्षीय महिलेचा अज्ञात रेल्वे गाडीची धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. तर आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यान मार्गावर जलद लोकलमधून पडल्याने एका 45 वर्षीय महिलेने जीव गमावला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिसऱ्या घटनेत सकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास अज्ञात गाडीतून पडून सुशील या पन्नास वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागला. तर सुमारे 42 वर्षाच्या व्यक्तीला कोपर ते डोंबिवलीदरम्यान अज्ञात रेल्वे गाडीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे.

अपघातात मृत पावलेले चारही मृतदेह रेल्वे पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघातातील तिघांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT