Next Generation Reporter Saam TV Dombivli pothole story saam tv
मुंबई/पुणे

Gen Alpha Club :हे रस्ते की बंजी जंपिंग?’ साम टीव्हीवर नेक्स्ट जनरेशन रिपोर्टरने पालिकेचा विकास रस्त्यावर आणला|VIDEO

Dombivli West Potholes And Dangerous Road Conditions During Monsoon: डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर चौकातील खड्ड्यांवर विद्यार्थिनी स्मिहा पाटोळे हिने थेट महापालिका प्रशासनाला सवाल केले. ‘फ्री बंजी जंपिंग’ची मिश्कील उपमा देत तिने रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांचा त्रास समोर आणला.

Omkar Sonawane

राज्यभरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामध्ये सरकारने केलेल्या विकासामध्ये अनेक नागरिक घसरून पडले तर काहींचा अपघात होऊन मृत्यूही झाला. मात्र सरकार आणि स्थानिक प्रशासन सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. याच समस्येची साम टीव्हीने गंभीर दखल घेत नेक्स्ट जनरेशन रिपोर्टर या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. यालाच आता राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून लहान चिमुकले आता सरकारने केलेली विकासाची पोलखोल करत आहे.

डोंबिवलीतील खड्ड्यांच्या समस्येबाबत स्मिहा पाटोळे या विद्यार्थिनीने थेट महापालिका प्रशासनाला काही सवाल केले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांना तिने मिश्कीलपणे ‘फ्री बंजी जंपिंगची उपमा देत महापालिकेच्या खड्डेमुक्त रस्त्यांच्या मोहिमेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच ठिकाणाहून स्मिहा पाटोळे हिने प्रशासनाला आरसा दाखवला.

स्मिहा पाटोळे, विद्यार्थिनी, डोंबिवली :

तुम्ही कधी फ्रीमध्ये बंजी जंपिंग केली आहे का? जर तुम्हाला फ्रीमध्ये जंपिंग करायची असेल, तर डोंबिवलीच्या रस्त्यांवरून एकदा टू-व्हीलर चालवून बघा. तुम्हाला फ्रीमध्ये बंजी जंपिंगचा अनुभव मिळेल.

माझे बाबा जेव्हा मला सकाळी शाळेत सोडायला जातात, तेव्हा हा अनुभव मी रोजच घेते. आता मी डोंबिवली पश्चिमेकडील गणेश चौकात उभी आहे. तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर इतके खड्डे आहेत की वाट काढतानाही भीती वाटते. एखादी गाडी या खड्ड्यात अडकून अपघात होऊ शकतो.

हे खड्डे आता पडलेले नाहीत, तर हा रस्ता कायमच अशाच अवस्थेत असतो. मला शाळेत जाताना या खड्ड्यांमुळे खूप उशीर होतो. त्यामुळे मला घरातून लवकर निघावे लागते. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे की, हे खड्डे लवकरात लवकर बुजवले पाहिजेत आणि ते पुन्हा पडणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सर्वात मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा 'सपा'त प्रवेश

Maharashtra News Live Update: पुणे शहरात २० टक्के पाणी कपात; खडकवासला धरणात ८२ टक्के पाणीसाठा

नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

Pimpri-Chinchwad : २-३ दिवसांत करा पिंपरी-चिंचवडची सफर, ऑक्टोबरमध्ये ट्रिपसाठी 'ही' ७ ठिकाणे बेस्ट!

October Heatwave: ऑक्टोबरमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्या! उष्णतेमुळे होऊ शकतो त्रास, पालकांनो या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT