Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: चोरीसाठी घरगडी झाला, मेहुण्यासोबत घरावर डल्ला मारत १५ लाख लंपास, डोंबिवली पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला

Kalyan Crime News: घरगडी बनून साथीदारांसह घरामधील लाखोंचा मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला विष्णू नगर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

घरगडी बनून साथीदारांसह घरामधील लाखोंचा मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला विष्णू नगर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. डोंबिवलीत घर काम करणाऱ्या घरगडीने आपल्या मेहूणा आणि अन्य दोन साथीदारांसोबत चोरी केली. विष्णूनगर पोलिसांनी रिक्षा चालकाच्या दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करत तीन चोरट्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लील बहादूर कामी, टेकबहादूर शाही, मनबहादूर शाही, असं अटक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार सागर विश्वकर्मा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे चौघे मूळचे नेपाळचे आहेत. लील बहादूर या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या विरोधात वसई, तेलंगणामध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने घरफोडी प्रकरणी याआधी दीड वर्ष शिक्षा भोगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कुंदन म्हात्रे यांच्या घरात 27 जुलै रोजी संध्याकाळी चोरी झाली. घरातील महागडे दागिने काही रोकड, असा एकूण 15 लाखाहून अधिक मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले हाेते. या प्रकरणात विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डीपीसी सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दिपविजय भवार, पोलिस अधिकारी गहीनाथ गमे, सचिन लोखंडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.

चोरीची घटना घडल्यानंतर कुंदन यांच्या घरात काम करणारा घरगडी सागर विश्वकर्मा उर्फ थापा हा पसार झाला होता. पोलिसांना सागरवर संशय होता. पोलीस सागरचा शोध घेत होते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. चोरीची घटना घडली त्यादिवशी रात्री सागर एक रिक्षा पकडून शीळ फाट्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांचे पथक शीळ फाट्याला पोहचले. शीळ फाट्याच्या रिक्षा स्टँडवर सागरचा फोटो दाखवत पोलिसांनी विचारपूस केली.

त्यावेळी एका रिक्षा चालकाने या प्रवाशाला नवी मुंबईतील कामोठे येथे सोडल्याचे सांगितले. रिक्षाचालकाने दिलेला माहितीनुसार, पोलीस त्याठिकाणी पोहचले. कामोठे परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सीसीटीव्हीच्या मदतीने सागर ज्या घरात गेला होता. ते घर शोधले. त्या घरात राहणाऱ्या लील बहादूर कामी याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांना संशय आल्यानंतर त्याला पोलीस खाक्या दाखवला असता तो सागरचा मेव्हणा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लील बहादूरला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सागरच्या मदतीने साथीदारांसह मालकाच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT