Dombivli MIDC Chemical Companies Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli MIDC: मोठी बातमी! डोंबिवली MIDC मधील केमिकल कंपन्याचा पाणी-वीज पुरवठा खंडीत, नेमकं कारण काय?

Dombivli MIDC Chemical Companies: डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही केमिकल कंपन्यांना क्लोजर नोटीस बजावत वीज आणि पाणीपुरवठा खंडीत केला आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीमधील (Dombivli MIDC) अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. सरकारने डोंबिवली एमआयडीसीमधील घातक कंपन्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही केमिकल कंपन्यांना क्लोजर नोटीस बजावत कंपन्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत केला आहे. या करवाईमुळे एमआयडीसीतील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवली औद्योगिक उद्योजकांना औद्योगिक विकास मंडळाने क्लोजर नोटीस धाडल्या होत्या. या नोटिसांना कंपनी धारकांनी विरोध केला होता. या कारवाईच्या विरोधात जवळपास ४०० उद्योजकांनी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र त्यांचा हा मोर्चा फेल ठरला असून अधिकाऱ्यांनी या मोर्चाला न जुमानता धडक कारवाई केली आहे. औद्योगिक विकास मंडळाने थेट या कंपन्यांचा वीज आणि पाणी पुरवठा बंद केला आहे.

डोबिंवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टाने ३१ मे रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तपासात प्रगती नसल्याने पोलिसांना आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्यास कोर्टाने नकार दिला होता. ठाणे क्राईम ब्रँचने मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांची २ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागितली होती. पण कोर्टाने पोलिस कोठडी वाढवून न देता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडी मिळताच स्नेहा मेहता यांनी जामीनासाठी अर्ज केला. आपली दोन मुलं लहान असल्याचे सांगत त्यांनी जामीन द्यावा अशी मागणी केली.

दरम्यान, २३ मे रोजी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे डोंबिवली शहर हादरले होते. या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. कंपनीमध्ये काम करणारे ९ जण अद्याप बेपत्ता आहेत. कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. हा स्फोट झाला तेव्हा तीन ते चार किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला होता. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT