Dombivli Crime News Saam News
मुंबई/पुणे

Dombivli Crime : संतापजनक! मुजोर रिक्षाचालकाची दादागिरी, प्रवाशाला दांडक्यानं केली मारहाण; VIDEO

एका मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत प्रवासी जखमी झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Dombivli Crime News: डोंबिवली येथे संतापजनक घटना घडली आहे. एका मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत प्रवासी जखमी झाला आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरातील इंदिरा चौकात ही घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील स्टेशन परिसरातील इंदिरा चौकात हा संतापजनक प्रकार घडला आहे.

रिक्षाचालकांकडून (Auto Rickshaw driver) भाडे नाकारणे, प्रवाशांना मारहाण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे मुजोर रिक्षाचालकांविरोधात सर्वसामान्यांच्या मनात एकप्रकारची चीड आहे. अशीच एक घटना डोंबिवलीत (Dombivli) घडली आहे.

रिक्षाचालकाने जास्त प्रवासी भाडे सांगितले. त्यावर प्रवाशानं त्याला विचारणा केली. त्यावर राग आल्याने रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली. इतकेच काय तर रिक्षात ठेवलेले दांडके त्याने बाहेर काढले आणि त्याने प्रवाशाला मारहाण केली. या मारहाणीत प्रवासी जखमी झाला आहे.

रिक्षाचालकाची मुजोरी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद (CCTV) झाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्रवाशाने तक्रार दाखल केली असून, त्यावरून संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

''मी नेहमीप्रमाणे आपल्या घरी जात होतो. साडेअकरा ते पावणेबारा झाले होते. रिक्षाचालकाने त्या वेळेला ३०-४० रुपये भाडे सांगितले. नेहमी २०- २५ रुपये घेतात. त्यावर त्यांनी मला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. पाठीवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत. या रिक्षाचालकावर कारवाई झाली पाहिजे. नेहमी प्रवास करतात त्या प्रवाशांना त्रास व्हायला नको, म्हणून कारवाई करावी. महिला असो की कुणी असो हे नेहमीच अशा प्रकारची अरेरावी करतात,'' असे प्रवासी गणेश तांबे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Skin Care : ना पपई, ना केळी; उन्हाळ्यात लावा 'या' फळाचा फेसपॅक, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

BSNL: फक्त १ रुपयांत ३० दिवस फ्री कॉलिंग, दिवसाला २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस

बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शासनाला अहवाल सादर

Ashok Kharat Update : भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची कोठडी, कोर्टात काय काय घडलं?

SCROLL FOR NEXT