Highway Toll Price Hike: मुंबई-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रवास महागणार; टोलच्या दरात मोठी वाढ, वाचा नवे दर
Toll Price Hike: मुंबई-पुणे आणि मुंबई-आग्रा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे. या दोन्ही महामार्गावरुन प्रवास करताना वाहनधारकांचा खर्च वाढणार आहे. कारण येत्या 1 एप्रिलपासून दोन्ही महामार्गांवरुन प्रवास करताना अधिकचा टोल द्यावा लागाल. त्यामुळे आधीच इंधनाचे वाढलेले दर आणि आता वाढलेला टोल यामुळे दुहेरी फटका आपल्या गाडीने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे बस आणि टॅक्सीचे तिकीट वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. टोल वाढ आधीच जाहीर झाली होती. त्याची अमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. (Latest Marathi News)
मुंबई पुणे महामार्गावर 1 एप्रिलपासून कारसाठी 320 रुपये, बस 940 रुपये, टेम्पो 495 रुपये, ट्रक 685 रुपये, थ्री अॅक्सेल ट्रक 1630 रुपये आणि मल्टीअॅक्सेलसाठी 2165 रुपये टोल आकारला जाणार आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील वाढलेले टोल दर
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर छोट्या कार, चारचाकी वाहनांना १ एप्रिलपासून २२० रुपयांऐवजी ३३५ रुपये टोल द्यावा लागणार आहे.
तर बस, ट्रकसाठी ७५० रुपयांऐवजी १,१२५ रुपये टोल भराव लागेल. अन्य वाहनांच्या टोल दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना मात्र टोल शुल्कात सवलत कायम असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.