Residents protest against alleged housing fraud in Dombivli after fake government documents were exposed. saam tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीमध्ये मोठा घोटाळा उघड! जिल्हा परिषदेचा खोटा शिक्का वापरून इमारत ‘कायदेशीर’ दाखवली

Dombivli illegal building scam with fake Zilla Parishad seal: डोंबिवलीत अनधिकृत इमारत अधिकृत दाखवण्यासाठी जिल्हा परिषदेची बनावट सही आणि शिक्का वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर. रहिवाशांची मानपाडा पोलिसांत तक्रार; कारवाईची मागणी.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीतील एका अनधिकृत इमारतीला अधिकृत असल्याचे भासविण्यासाठी जिल्हा परिषदेची खोटी सही आणि बनावट शिक्का वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी मानपाडा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, चाळीच्या जागी इमारत उभारण्याच्या नावाखाली जागा घेऊन रहिवाशांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर उभारण्यात आलेली इमारत अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेची खोटी सही आणि बनावट शिक्का वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी रामचंद्र माने, लक्ष्मण मिसाळ, मोहनलाल चौधरी आणि रामदास टेकाळे यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र संबंधित भूमाफियांना राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे

तक्रारदार रहिवासी प्रेरणा जाधव यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांचे गृहकर्ज जास्त व्याजदराने सुरू असल्याने ते दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बँकेने कागदपत्रांची पडताळणी केली असता, संबंधित कागदपत्रांमध्ये बनावट सही आणि शिक्क्याचा वापर झाल्याचे उघड झाले. त्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा प्रकार समोर आला. न्याय मिळत नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, कारवाई न झाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT