Handvo Chilla Recipe: सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी बनवा हांडवो चिल्ला, सोपी रेसिपी जाणून घ्या

Sakshi Sunil Jadhav

पौष्टिक नाश्ता

हांडवो चिल्ला हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि पौष्टीक नाश्ता मानला जातो.

handvo chilla recipe in marathi

साहित्य

तांदूळ, मसूर डाळ, उडीद डाळ, पिवळी मूग डाळ, दही, आवडीच्या भाज्या यांचा वापर करून ही रेसिपी तयार केली जाते.

handvo chilla recipe in marathi

भाज्यांचा भरपूर वापर

दुधी, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर यामुळे चव आणि पोषण दोन्ही वाढतं.

handvo chilla recipe in marathi

आधीच तयारी आवश्यक

तांदूळ आणि सर्व डाळी रात्रभर भिजवून ठेवणे गरजेचे असते, त्यामुळे चिल्ल्याचा बॅटर चांगला तयार होतो.

handvo chilla recipe in marathi

बॅटर तयार करा

सकाळी भिजवलेले तांदूळ आणि डाळी बारीक वाटून स्मूथ पीठ तयार केले जाते. त्यात दही आणि भाज्या मिसळल्या जातात.

handvo chilla recipe in marathi

तडका द्या

राई आणि कढीपत्त्याचा तडका घालून चिल्ल्याच्या मिश्रणाला जास्त चविष्ट बनवलं जातं.

handvo chilla recipe in marathi

बनवण्याची सोपी पद्धत

तव्यावर थोडे तेल टाकून हे मिश्रण चिल्ल्यासारखे पसरवून दोन्ही बाजूंनी छान भाजले जाते.

handvo chilla recipe in marathi

सर्व्ह करा

गरमागरम हांडवो चिल्ला दही किंवा चटणीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव जास्त वाढते.

handvo chilla recipe in marathi

NEXT: राजा शिवाजी चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्रात कुठे झालंय? ही ४ ठिकाणं तुम्हाला माहितीयेत का?

Raja Shivaji Movie Shooting Locations
येथे क्लिक करा