Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli : डोंबिवलीत महापालिकेची मोठी कारवाई! ११४ दुकानांना ठोकलं टाळं; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Dombivli News : डोंबिवली पूर्वेतील मधुबन सिनेमासमोरील भाजी मार्केटमध्ये केडीएमसीने मोठी कारवाई करत 114 दुकाने सील केली आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून पुढील तपासही सुरू आहे.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीत KDMC ची मोठी कारवाई; ११४ दुकाने सील

  • मधुबन मार्केटमध्ये अवैध बांधकामांवर हातोडा

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

  • पुढील तपास आणि करारांची छाननी सुरू

डोंबिवली, संघर्ष गांगुर्डे

Kalyan Dombivli News कल्याण डोंबिवलीत मागील महिनाभरापासून केडीएमसी (KDMC) ऍक्शन मोडवर आहे. रेल्वे स्टेशन परिसरात चालू असणाऱ्या अवैध गाळ्यांवर पालिकेने कारवाई केली आहे. नागरिकांना ये - जा करताना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येते. अशातच आता डोंबिवली पूर्व स्टेशनबाहेरील उरसेकर वाडी परिसरातील मधुबन सिनेमासमोरील भाजी मार्केटच्या गाळ्यावर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त भरत पवार, प्रसाद ठाकूर आणि मालमत्ता कर विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत एकूण ११४ दुकाने सील केली आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा मूळतः भाजी मार्केटसाठी वाटप करण्यात आली होती. परंतु या जागेवर अनेक व्यापाऱ्यांनी कायमस्वरूपी दुकाने बांधून शटर लावले होते. हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अनियमिततेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या दुकानांवर कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता संबंधित दुकानदारांच्या करारांची तपासणी केली जाईल. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल किंवा बेकायदेशीरपणे दुकान भाड्याने दिले असेल, तर त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई केली जाईल. या वेळी पोलीसही तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान, काही दुकानदारांनी निषेध नोंदवला आणि पालिकेला आताच का कारवाई करण्याची आठवण झाली? असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरातील मधुबनची (Madhuban) गल्ली ही प्रसिद्ध असून येथे दररोज अनेकजण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात. कपडे, भाजी, दागदागिने, खेळण्यांसाठी ही गल्ली प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पालिकेने केलेल्या कारवाईनंतर या गल्लीतील अनेक फेरीवाल्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदी विक्रीला तेजी; आतापर्यंत 9 लाख हळद पोत्याची विक्री

Jio Recharge: खुशखबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; सोबत अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा, वाचा किंमत..

SSC Result 2026: दहावीचा निकाल कसा पाहायचा? या वेबसाइट आताच नोट करा

Akshaya Tritiya 2026: सोनं परवडत नाही? अक्षय तृतीयेला घरी आणा 'या' ३ गोष्टी; वर्षभर राहील सुख-समृद्धी!

Nepal tourism: हिमालयाच्या कुशीतला स्वर्ग! नेपाळमधील ही ठिकाणं तुमच्यासाठी ठरतील बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT