manpada police station  Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli Crime News: धक्कादायक! मुलीच्या आजारपणाला दारुडा बाप कंटाळला; गतिमंद लेकीसोबत केलं भयंकर कृत्य

Dombivli Crime News: डोंबिवलीत एका नऊ वर्षीय गतिमंद मुलीची तिच्या दारुड्या बापाने हत्या केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Dombivli Crime News:

डोंबिवलीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीत एका नऊ वर्षीय गतिमंद मुलीची तिच्या दारुड्या बापाने हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांत ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत एका नऊ वर्षीय गतिमंद मुलीची तिच्याच दारुड्या वडिलांनी ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोज कुमार अग्रहरी असे या निर्दयी वडिलाचे नाव आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात मनोजकुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या आजारपणाला कंटाळून दारुड्या मनोज कुमार याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा माणगाव येथे म्हात्रे चाळीत मनोज कुमार त्याची पत्नी लीलावती व त्यांच्या चार मुलीसह राहत होते. त्याच्या चार मुलींमधील एक मुलगी गतिमंद होती.

मनोज कुमार मजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो पत्नीसह मुलींना देखील मारहाण करायचा. आठवडाभरापूर्वीच मनोज कुमार याने आपल्या गतिमंद मुलीला बेदम मारहाण केली होती.

अवघ्या काही तासांत आरोपीला अटक

काल सायंकाळच्या सुमारास मनोज कुमार दारू पिऊन घरी आला. त्याने त्याच्या गतिमंद मुलीला मारहाण केली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली, त्यानंतर मनोज कुमार तिथून पसार झाला.

काही वेळाने मनोज कुमार यांची पत्नी घरी आल्यानंतर तिला आपल्या मुलीचे हत्या झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी निर्दयी मनोज कुमारचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या काही तासात मनोज कुमार याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT