बिहारची राजधानी पाटणा येथे संतापजनक घटना घडलीय. १५०० रुपयांचे व्याज दिलं नाही म्हणून एका दलित महिलेला विवस्त्र करत तिला बेदम मारहाण करण्यात आलीय. इतकेच नाहीतर तिला लघवी पिण्यास भाग पाडल्यांची घटना खुसरुपूर ब्लॉकच्या मोसिमपूर पंचायतमध्ये घडली. ही घटना रविवारी रात्री १० वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Crime News)
याबाबत पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेरील नळातून पाणी भरत होती. त्यावेळी ग्राम पंचायतमध्ये कार्यरत असलेला एक धनाढ्य व्यक्तीनं सांगितलं की, त्याने तिच्या पतीला ओलिस ठेवलं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या महिलेला त्याच्या घरी नेलं. घरी नेल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला विवस्त्र करत तिला बेदम मारहाण केली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार त्या धनाढ्य व्यक्तीचं नाव प्रमोद सिंग सांगण्यात येत आहे. महिलेला झालेल्या मारहाणीमध्ये तिचं डोकं फुटलं असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीडिता पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ६ मधील रहिवासी आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद सिंहने त्यांच्या मुलला पीडितेच्या तोंडात लघवी करायला लावली. त्यानंतर ती पीडिता जीव मुठीत घेऊन तिच्या घराकडे घराकडे धावत सुटली. रस्तात तिचा दाजी भेटला त्याने तिला घरी नेलं त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या पीडितेला खुसरूपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खुसरूपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात जावून पीडितेचा जबाब घेतला.
पीडितेच्या पतीने प्रमोद सिंग यांच्याकडून १५०० रुपयांचे कर्ज घेतलं होतं. परंतु प्रमोद सिंग हा कर्जाव्यक्तिरिक्त व्याजाच्या स्वरुपात आगाऊ रकमेचे मागणी करत होता. पैशांसाठी त्याने महिलेला आणि तिच्या नवऱ्याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत प्रमोद सिंग याने मारहाण केली. पीडितेला विवस्त्र करत प्रमोद सिंग यांचा मुलगा अंशू कुमारला तोंडात लघवी करण्यात आल्याचं नमूद केले आहे. दरम्यान संपूर्ण कुटुंब भयभीत आणि चिंतेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.