डोंबिवलीजवळील घारीवलीत धक्कादायक घटना
एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाबाला जबर मारहाण
मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू
१४ जणांविरोधात गुन्हा; चार जण ताब्यात
परिसरात तणाव; पोलिसांचा तपास सुरू
संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली
Dombivli Gharivli Murder News डोंबिवलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरालगतच्या घारीवली परिसरात जुन्या वादातून घडलेल्या हिंसक हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दहा ते पंधरा जणांच्या जमावाने एका तरुणाला घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव, त्यांचे वडील बामा जाधव आणि भाऊ दिनेश जाधव हे कुटुंबासह घारीवली गावात राहतात. काल रात्री कुटुंब जेवण करत असताना काही जणांनी दिनेश जाधव याला घराबाहेर बोलावले. घराबाहेर जाताच आधीपासून दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या जमावाने त्याच्यावर अचानक हल्ला करत बेदम मारहाण सुरू केली. दरम्यान, दिनेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ राहुल आणि वडील बामा जाधव हे बाहेर आले. मात्र, जमावाने त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला.
या हल्ल्यात बामा जाधव यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही परिसरात वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेमुळे घारीवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.