Dombivli Crime X
मुंबई/पुणे

Dombivli Crime : डोंबिवली हादरली! १५ वर्षीय मुलीचं अपहरण, खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार, गर्भपातानंतर नको ते केलं...

Dombivli News : डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करुन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गर्भधारणा झाल्यानंतर तिला गर्भपात करायला लावला, त्यानंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलले.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती राहिलेल्या पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.अखेर टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली.पोलिसांनी एक महिलेसह तिचा पती, दोन पुरुष अशा चार जणांना बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली जवळील ग्रामीण परिसरात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते .तो देखील मसाले विक्रीचा व्यवसाय करत होता. याच ओळखीचा फायदा घेत आशुतोषने पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. अल्पवयीन मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले. त्यामुळे ही रागावलेली पीडितेने आशुतोषशी संपर्क साधला व त्याच्या घरी गेली. या संधीचा आशुतोषने फायदा घेतला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोधा-शोध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आशुतोष हा तिच्या आईला भेटत होता. 'मी तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले त्या ठिकाणी बघितले', असे सांगून मुलगी शहरातच आहे असे सांगत होता. मुलगी रागवलेली असल्याने ते परत येईल या आशेने पीडितेची आई आशुतोषवर विश्वास ठेवत होती. मात्र दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला. तिने याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची नोंदवली.

पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. याचदरम्यान ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी. या ठिकाणी छापा टाकत या पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मुस्कान शेख तिचा नवरा यांच्यासह दोन जणांना अटक केली.

चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. आशुतोष राजपूत याने मुलीचं अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीता गर्भवती राहिली. तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्या ठिकाणाहून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते. तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय तर या प्रकरणात आशुतोष राजपूत हा अद्याप फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT