डोंबिवलीत शिवजयंतीवरून भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध! SaamTvNews
मुंबई/पुणे

डोंबिवलीत शिवजयंतीवरून भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध!

शिवसेनेकडून शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवाजी महाराजांऐवजी संभाजी महाराजांचा फोटो, यावरून भाजपकडून शिवसेनेवर टीका!

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेने एकमेकांना लक्ष केल्याचे दिसून आले आहे. डोंबिवली शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांची शहरात मिरवणूक तर काढलीच, तर ठीक ठिकाणी बॅनर लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यातील एका बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरला. कारण त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) फोटो ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) फोटो लावण्यात आला होता. याच बॅनरबाजी वरून भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं. (Dombivli Latest News)

हे देखील पहा :

डोंबिवली भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. यांचा पिंड हिंदुत्व नाही, यांना हिंदुत्व काय हे आधी माहीतच नव्हतं. हे उसनवार घेतलेले शहरप्रमुख आहेत म्हणून अशा चुका घडतात अशी टीका चव्हाण यांनी केली. पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे (Dr.Shrikant Shinde) यांचे डोळे उघडले आहेत की नाही, हे पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यातच आता या बॅनर वरून पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला लक्ष केले.

दरम्यान, भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण यांच्या टीकेला शिवसेनेने (Shivsena) प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की भाजप आमदारांना इतकेच सांगणे आहे, उल्हासनगरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शिवजयंती निमित्त आम्ही डोंबिवलीत होर्डिंग लावले होते, त्यामध्ये दोन ठिकाणी नजरचुकीने संभाजी महाराजांचे फोटो आले आहेत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र इतर सर्व बॅनर मध्ये शिवाजी महाराजांचे फोटो होते. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्ववादी राहणार असल्याचे राजेश मोरे यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT