MIDC News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli MIDC News: मोठी बातमी! भट्टीमधील वायू आणि कोळसा थेट अंगावर; ६ कामगार गंभीर जखमी

MIDC News : सहा जखमी कर्मचाऱ्यांना डोंबिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Accident News: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीच्या बॉयलर भट्टीमधील वायू व कोळसा अंगावर उडून ६ कामगार यात भाजले गेलेत. भाजल्याने कामगारांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या सहा जखमी कर्मचाऱ्यांना डोंबिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(MIDC Company)

मिळालेल्यामाहितीनुसार, काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत जय इंडस्ट्रीज कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

डोंबिवली (Dombivli) एमआयडीसी परिसरातील जय इंडस्ट्रीज केमिकल कंपनीमध्ये काल सकाळच्या सुमारास कामगार काम करत होते. याच दरम्यान कंपनीच्या बॉयलर विभागात बॉयलर भट्टीमधील वायू व कोळसा कामगारांच्या अंगावर उडाला. या दुर्घटनेत काम करत असलेले सहा कामगार जखमी झाले.

या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपघात होऊ नये यासाठी पुरेशी काळजी न घेतल्याने तसेच कंपनी प्रशासनाकडून केलेला निष्काळजपणामुळे सदरची घटना घडल्याचा ठपका ठेवत जय इंडस्ट्रीज कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT