Success Story Saam Tv
मुंबई/पुणे

Success Story: भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला सीए; आई-लेकाच्या मिठीनं डोंबिवली भावूक, Video

Success Story: भररस्त्यात आईनं मुलाला मारलेली घट्ट मिठी. डोळ्यावाटे आनंदाश्रू. हे सारं घडलं डोंबिवलीतल्या रस्त्यावर. मुलगा सीए झाला, हे कळताच, भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत योगेश सीए झाला.आणि त्यानंतर काय घडलं पाहुयात हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश पाटील, साम प्रतिनिधी

योगेशने आपल्या मेहनतीने चार्टड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण केली. योगेश हा डोबिंवलीचा रहिवासी आहे. त्याची आई डोबिंवलीत भाजी विकते. कितीही गरीब परिस्थिती असली तरीही माणूस खूप यशस्वी होऊ शकतो हे योगेशने सिद्ध केलं.

डोंबिवलीच्या खोणी परिसरात आपल्या दोन मुले आणि एका मुलीसोबत राहणाऱ्या नीरा ठोंबरे. यांचा मुलगा योगेश हा चार्टड अकाउंटंट झाला. चार्टड अकाउंटंट झाल्यानंतर त्याने आपल्या आईला कडकडून मिठी मारली. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. योगेश हा एका भाजीविक्रेत्याचा मुलगा आहे. त्याची आई गांधानगरमधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकते. त्याने खडतर परिस्थितीवर मात करुन यश मिळवले आहे.

नीरा ठोंबरे या डोंबिवली जवळील खोणी परिसरात आपली दोन मुले विकास, योगेश व मुलगी सोनलसह राहतात. निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात गेल्या 22 ते 25 वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करतात. योगेश नववीत असताना त्याचे वडील वारले .त्यानंतर योगेशची जबाबदारी संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली मात्र हार न मानता पैशाची जुळवा जुळव करत त्यानी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नीरा यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला, त्याचं फलित योगेश आज सीए झालाय. जिद्द आणि कष्टाचं फळ निरा ठोंबरे आणि योगेश ठोंबरे यांना मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: अमिर खानसोबत नेमकं काय घडलं? हमसून रडला, शर्टाने पुसले डोळे, VIDEO व्हायरल

Why do we get nightmares: रात्री अचानक घाबरवणारी स्वप्नं का पडतात? वाचा त्यावेळी मेंदूत नेमकं काय घडतं?

High Blood Pressure : हाय BP च्या औषधांना कंटाळलात? 'या' ५ आयुर्वेदिक उपायांनी रक्तदाब राहील नियंत्रणात

Blouse Back Neck Designs: सिंपल टू मॉडर्न, स्लिव्हलेस ब्लाऊजचे ट्रेडिंग 5 पॅटर्न

Maharashtra News Live Update: ठाण्यातील कासारवडवलीच्या निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात हाणामारी

SCROLL FOR NEXT