डोंबिवली : डोंबिवलीमधील मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांना डोंबिवलीतील (Dombivali) देसलेपाडा येथील एका घरात विक्रीसाठी गांजाचा (Drugs) साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील तारमळे यांच्या पथकाने देसले पाडा येथील एका इमारतीच्या घरात छापा (Raid) टाकला. या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला. (Dombivali police raid, cannabis smugglers Arrested; Shocking information revealed)
हे देखील पहा -
मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला मोबाईल फोन. रोख रक्कम, गाडी असा एकूण 1 लाख 87 हजरांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मयूर जडाकर व अखिलेश धुळप या दोघांना अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता सदरचा गांजा त्यांनी शिरपूर (Shirpur) येथून विकत आणला असल्याचे माहिती दिली पोलिसांनी शिरपूर घाटात सुनील लोक भजन पावरा यांना शिरपूर येथून अटक केली. धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर लाकड्या हनुमान गाव येथे एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.