Mumbai Local Train Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबईकडे जाणाऱ्या एसी लोकलवर दगडफेक; माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात

Dombivali News : दगडफेकीत सुदैवाने कोणी प्रवाशी जखमी झाला नाही. मात्र या घटनेने रेल्वेतील प्रवाशी भयभीत झाले होते

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: ठाकुर्ली- डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणाऱ्या टिटवाळा एसी लोकलवर रेल्वे (Railway) रुळालगत उभ्या असलेल्या एका माथेफिरूने दगडफेक केली. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे रेल्वेतील प्रवाशी घाबरले होते. (Breaking Marathi News)

अनेकदा धावत्या रेल्वेवर दगडफेक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात प्रवाशी जखमी देखील झाले आहेत. तर आज मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एसी लोकल ट्रेनवर (Mumbai Local) देखील एकाने दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत सुदैवाने कोणी प्रवाशी जखमी झाला नाही. मात्र या घटनेने रेल्वेतील प्रवाशी भयभीत झाले होते.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवांशानी केली तक्रार 

दगडफेकीत लोकलच्या खिडकीची काच फुटली असून सुदैवाने या दगडफेकीत कुणी प्रवासी जखमी झाले नाही. याबाबत प्रवाशांनी रेल्वेला तक्रार केल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याच परिसरातुन एका संशयित माथेफिरूला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. त्याने दगडफेक का केली हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT