Dombivali News  Saam Digital
मुंबई/पुणे

Dombivali News : चोरट्याने आजीची चेन हिसकावून काढला पळ, लोकांच्या भीतीने नाल्यात मारली उडी अन् घडलं भलतंच

Dombivali Crime News : डोंबिवलीत चोरटा एका आजीची चेन हिसकावून पळत होता. मात्र लोकांनी पाठलाग सुरू केल्यामुळे नाल्यात उडी मारली. त्याच्यामागावर आलेल्या पोलिसांनीही नाल्यात उडी मारून या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख

पाण्याची बोटल खरेदी करण्याच्या बहाण्याने एक चोरटा 72 वर्षीय वृद्ध महिलेच्या दुकानात गेला. संधी साधत वृद्ध महिलेच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावून पळ काढला. घटना पाहिल्यानंतर काही नागरिकांनी ,पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला. नागरिक आपल्याला मारतील या भीतीने चोरट्याने नाल्यात उडी मारली, मात्र पोलिसांनी नाल्यात उडी मारत या चोरट्याला अटक केली तर त्याच्या साथीदाराच्या पोलीस शोध घेत आहेत. गणराज छपरवाल असं या चोरट्याचं नाव आहे.

डोंबिवली पूर्वेत कल्याण शीळ रस्त्यावर निस्मीता टी स्टॉल आहे. ७२ वर्षीय गुलाबी पुजारी या वृद्ध महिला हे दुकान चालवतात. मंगळवारी दुपारी आजी आपल्या दुकानात ग्राहकांसाठी चहा तयार करीत असताना पाण्याची बॉटल पाहिजे असल्याचा बहाणा करत दोन जण त्यांच्या दुकानात आले. पुजारी त्यांना पाण्याची बॉटल देण्यासाठी मागे फिरल्या असताना संधी साधत यामधील एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावली.

याच दरम्यान या चोरट्याचा साथीदार दुकानाबाहेर स्कुटी घेऊन उभा होता. प्रकार घडल्यानंतर गुलाबी पुजारी यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. हे पाहून लोक दुकानाकडे धावले. दुकानाजवळ काही अंतरावर पोलीस देखील या रस्त्यावर उभे होते. ते देखील दुकानाकडे धावून आले. हे बघून चोरट्याचा साथीदाराने आपली स्कुटी चालू केली आणि तिथून पळ काढला.मात्र ज्यांनी चैन हिसकावून घेतली होती तो चोरट्या रस्त्यावर पळत होता.

लोकांनी आपला पाठलाग सुरू केलाय . पकडले गेलो तर मारतील या भीतीने या चोरट्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नालात उडी मारली. त्यांनी उडी मारताच पोलिसांनी देखील नाल्यात उडी मारली. चोरट्याला पकडलं .चोरलेली चैन त्या नालात पडली. मानपाडा पोलिसांनी गणराज छपरवाल या चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या साथीदार भूषण जाधव याचा पुढील शोध घेत आहेत. गणराज हा डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्ती नगर शेलारा नाका परिसरात राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism: २० हजारांपेक्षाही कमीत एवढी मस्त ट्रिप? दिवाळी सुट्टीसाठी भारतातील ६ स्वस्त आणि सुंदर ठिकाणं

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापुरमध्ये सभा

Maharashtra Politics: एकामागोमाग एक, पक्ष नेत्यांचे राजीनामे;मतदारसंघातच आमदार रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर?

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

SCROLL FOR NEXT