पुणे: पुण्याचा Pune वानवडी Wanwadi पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आझदनगर मध्ये आज सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. येथील डॉक्टर Doctor दाम्पत्यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. Doctor couple commits suicide in Pune
एकीकडे आज डॉक्टर दिवस Doctors Day असल्यामुळे डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असताना ही दुःखद घटना घडल्यानं परिसरात व पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय २६) आणि निखिल दत्तात्रय शेंडकर (वय २८) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
हे देखील पहा-
आझाद नगर इथे अंकिता आणि निखिल हे दोघेही राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस करत होते. अंकिता यांची क्लिनिक गल्ली नंबर २ आझाद नगर येथील या ठिकाणी आहे. तर, निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी शाब्दिक वाद झाला होता. हे भांडण इतके विकोपाला गेले की दोघांनी आरडाओरड केला. अखेर अंकिताने रंगात आपला फोन ठेवून दिला. अंकिताने निखिल हे घरी आल्यावर दरवाजा उघडला नाही. यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला.
तेव्हा डॉ. अंकिता शेंडकर यांनी घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. वानवडी पोलिसांना त्यांनी रात्री आठ वाजता ही माहिती दिली. यानंतर लगेच पोलीस त्यांच्या घरी पोहचले. ससून रुग्णालयात अंकिता यांना नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात गळफास घेतल्याने मृत्यु झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांचा भाऊ ओमकार दत्तात्रय तळेकर यांच्या ताब्यात दिला.
निखिलला मोठा मानसिक धक्का अंकिताने आत्महत्या केल्याने बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला आणि आपले आयुष्य संपविले. मात्र एवढा मोठा टोकाचा वाद कोणता झाला ज्यामुळे अंकिता यांनी आत्महत्या केली ? ते दाम्पत्य फोनवरुन नक्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून पुढील तपास चालू आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.