Chandrashekhar Bavankule SaamTvNews
मुंबई/पुणे

BJP News : व्यवस्थित कामे करा अन्यथा राजीनामा घेऊ, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

Political News : भाजपची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाल्यानंतर काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पहिली बैठक पार पडली.

प्रविण वाकचौरे

Pune News :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना कंबर कसली आहे. भाजपने देखील तयारी सुरु केली असून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याची सूचना केली आहे. यावेळी व्यवस्थित कामे करा अन्यथा राजीनामा घेऊ, असा इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

भाजपची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाल्यानंतर काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पहिली बैठक पार पडली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या. पण जे पदाधिकारी व्यवस्थित काम करणार नाहीत, त्यांचा राजीनामा घेऊ असा इशाराही बैठकीत दिला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या शहराध्यक्ष धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या पदावरील पदाधिकाऱ्यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांवरून पक्षातील आमदार व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेल्या नाराजीची भाजपमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, माजी खासदार अमर साबळे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी यावेळी उपस्थित होते. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT