चुकीच्या बातम्या करु नका; एखादी कमी पडली तर मला मागा- देवेंद्र फडणवीस Saam tv
मुंबई/पुणे

चुकीच्या बातम्या करु नका; एखादी कमी पडली तर मला मागा- देवेंद्र फडणवीस

प्रदेशाध्यक्ष बदलाची कोणतीही चर्चा नाही, पक्ष आणि पक्षश्रेष्ठीही चंद्रकांतदादांसोबतआहेत तरी कृपया ,माध्यमांनी चुकीच्या बातम्या करु नका, एखादी बातमी कमी पडली तर मला मागा मी देतो' असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांना राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलाची शक्यता आहे का? आणि तशी काही हालचाल आहे का विचारलं असता त्यांनी 'प्रदेशाध्यक्ष बदलाची कोणतीही चर्चा नाही, चंद्रकांतदादा उत्तम काम करत आहेत, पक्ष त्यांच्या पाठीशी आहे आणि पक्षश्रेष्ठीही चंद्रकांतदादांसोबत आहेत तरी कृपया माध्यमांनी कांड्या पेटवू नका, आणि पतंगबाजी करु नका, चुकीच्या बातम्या करु नका, एखादी बातमी कमी पडली तर मला मागा मी देतो' असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.Do not spread false news; If there is a shortage, ask me

हे देखील पाहा-

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दिल्लीच्याBJP Leaders Delhi Tour वाऱ्या जास्त वाढल्या आहेत शिवाय यामुळे भाजपमध्ये कोणते अंतर्गत किंवा कोणते संघटनात्मक बदल होत आहेत का याबाबत सर्वांना शंका, उत्सुकता आहे. तसेच प्रदेशाध्यक्षचState President बदलायची काही चिन्हे आहेत की काय ?अशा सर्व प्रश्नांना आज फडणवीसांनी उत्तर देवून तात्पुरती तरी त्या विषयांबाबतची सगळ्यानां लागून राहीलेली उत्सुकता संपवून टाकली म्हणायला हरकत नाही.

ओबीसी आरक्षणावरती भाजपची भूमिका

ओबीसी आरक्षणावरतीOBC Reservation बोलताना फडणवीस म्हणाले 'नाना पटोलेNana Patole काय बोलले हे मी ऐकलं नाही, त्यामुळे त्या विषयावरती बोलणार नाही मात्र ओबीसी आरक्षनाबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण कायम होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेउ नका हीच आमची भूमिका आहे' असही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

मनसे युती?

भाजपच्या नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत त्यामुळे भाजपमध्ये कोणते संघनात्मक बदल होणार आहेत का असं विचारलं असता भाजपमध्ये कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत मात्र आत्ताच नवीन मंत्रीमंडळ झालेलं आहे, त्यांच्या भेटीगाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न यावरच हा दौरा असल्याच फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान चंद्रकांत दादाChandraknt patil आज दिल्लीत मनसेच्याMNS युती प्रस्तावाबाबत गेले असल्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत युतीवरती शिक्कामोर्तब होईल का ?याकडे सगळ्या भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांच लक्ष लागूण राहीलेल आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा कायदा रद्द करण्याचा मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले

Palak Pakoda Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

High Court Notice To BCCI: आईशप्पथ, खेळाडूंनी फस्त केली ३५ लाखांची केळी, बीसीसीआयचा बीपी वाढला; हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT