"...तर कोल्हापूरच काय; मी मुंबईतून निवडणूक जिंकून दाखवेन!"

'संजय राऊत यांनी म्हटलंय चंद्रकांतदादांनी कोल्हापूरातून निवडणूक लढऊन दाखवावी' या प्रश्नावरती चंद्रकांत पाटील म्हणाले ' ते म्हणत असतील तर कोल्हापूर काय मी मुंबईतून निवडणूक लढीन आणि जिंकूनही दाखवीन,'
"...तर कोल्हापूरच काय; मी मुंबईतून निवडणूक जिंकून दाखवेन!"
"...तर कोल्हापूरच काय; मी मुंबईतून निवडणूक जिंकून दाखवेन!"Saam tv

दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना 'संजय राऊत यांनी म्हटलंय चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरातून निवडणूक लढऊन दाखवावी' या पत्रकारांच्या प्रश्नावरती चंद्रकांत पाटील म्हणाले 'राऊत म्हणत असतील तर कोल्हापूर काय मी मुंबईतून निवडणूक लढीन आणि जिंकूनही दाखवीन,'Kolhapur, I will fight the election from Mumbai and win

हे देखील पाहा-

भाजपा-मनसे युती

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांच्यात युती होणार की नाही याकडे सगळ्याच लक्ष आहे कालच चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली आहे. आणि आज ते दिल्लीला गेले आहेत त्यामुळे मनसेच्या युतीबाबत दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार आहे की काय अशी उत्सुकता राज्यातील मनसे भाजपा कार्यकर्त्यांना लागून राहीली आहे.

मविआ सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष

आदित्य ठाकरे च्या नेतृत्वात शिवसेना बीएमसी  निवडणूक लढवणार आहे असा प्रश्न विचारला असता 'आमच मुंबईत उत्तम संघटन आहे, आम्हाला काही आव्हान नाही कोणाचही नेतृत्व असलं तरी आम्हाला फरक पडत नाही असही पाटील यावेळी म्हणाले. तसेच लोकांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष आहे. आता आलेल्या महापुरामध्ये जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीच्या भरपाईचे पैसे अजून लोकांना मिळालेले नाहीत, कोविड परिस्थिती आणि मुंबईच कनेक्शन राज्यात सर्वत्र आहे, लोकांमध्ये नाराजी आहे. आदित्य ठाकरे काय किंवा दुसरं कोणाही आलं तरी काही फरक पडत नाही.

"...तर कोल्हापूरच काय; मी मुंबईतून निवडणूक जिंकून दाखवेन!"
Breaking| मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस लिक; अग्निशमनच्या 4 गाड्या दाखल

भाजपमध्ये  संघटनात्मक बदल करण्याची सध्या काहीही गरज नाही किंवा तशी शक्यता नाही. तसेच देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची अमित शहा सोबत भेटीवरती बोलताना पाटील म्हणाले या भेटीत राजकीय चर्चा काही नाही, नेते काही कार्यकर्त्यांचे प्रश्न घेऊन येतात,अधून मधून या भेटी होत असतात .

करेक्ट कार्यक्रम होणार

तसेच येत्या निवडणूकांमध्ये करेक्टट कार्यक्रम होणार आहे शुभेच्छया असू द्या असं म्हणत त्यांनी येणाऱ्या मुंबई निवडणूकीसाठी भाजपा सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com