Breaking| मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस लिक; अग्निशमनच्या 4 गाड्या दाखल

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Breaking| मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस लिक; अग्निशमनच्या 4 गाड्या दाखल
Breaking| मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस लिक; अग्निशमनच्या 4 गाड्या दाखलSaam Tv
Published On

मुंबई : दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात Kasturba Hospital LPG गॅस गळती झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 वॉटर टँकर देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हे देखील पहा-

गॅस गळती Gas Leak रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. या गॅस गळती घटनेचा रुग्णांना कोणताही त्रास होऊ यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माहिती आहे की, अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे तसेच रेक्यू ऑपरेशन सुरू आहे. शनिवारी सकाळी 11.30 वाजच्या सुमारास रुग्णालयातील LPG गॅस लिक झाल्याचे रुग्णालयातील Hospital कर्मचाऱ्यांच्या Workers लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्वरित याची माहिती अग्निशमन दलाला Fire brigade दिली त्यानंतर अग्निशम दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलीस तसेच सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त कस्तुरबा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. कस्तुरबा रुग्णालयातील इमारत क्रमांक 148 मध्ये गॅस गळती झाली आहे. इमारतीत असलेल्या 40 ते 50 रुग्णांना इतर सुरक्षित Safe इमारतीत हलवण्यात आले आहे. याबद्दल प्राथमिक माहिती समोर येत आहे की, LPG गॅसच्या कनेक्शनमध्ये बिघाड झाला होता. अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com