हजारो वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी वेतनाविना अंधारात Saam TV
मुंबई/पुणे

हजारो वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी वेतनाविना अंधारात

55 कामगार शहीद झाले तसेच वीज बिल वसुलीसाठी प्रसंगी वीज ग्राहक नागरिकांच्या शिव्या, मार खाऊन वीज बिल वसुली देखील जोमाने केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: महावितरण महापारेषण महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांचे दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न झाल्याने त्यांची दिवाळी वेतना विनाअंधारात जाणार आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने आज पुण्यातील रास्ता पेठ येथील वीज कंपनी येथे प्रशासन आणि ऊर्जा मंत्रालयाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. कोरोना काळात या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून राज्यातील जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देण्यात मोठे योगदान दिले. 55 कामगार शहीद झाले तसेच वीज बिल वसुलीसाठी प्रसंगी वीज ग्राहक नागरिकांच्या शिव्या, मार खाऊन वीज बिल वसुली देखील जोमाने केली आहे.

दीवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या कष्टकरी कंत्राटी कामगारांचे वेतन व बोनस दिवाळी पूर्वी होणे गरजेचे आहे असे पत्र संघटनेने दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. मात्र दीड महिना अगोदर पत्र देऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत या कामगारांची दिवाळी काळी करण्याचा घाट घातला आहे की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

रिक्त पदांवर तुटपुंज्या वेतनावर वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या व विक्रमी वीज बिलाचा महसूल गोळा करून कंपनीच्या संचालक मंडळ ते शिपाई पदाच्या कामगारांची दिवाळी गोड करणाऱ्या वीज कंत्राटी कामगारांना मात्र आज रोजी स्वतःच्या वेतनासाठी कंत्राटदारांना विनवण्या करण्याची व आपल्याच हक्काच्या कष्टाच्या घामाच्या मेहनतीच्या वेतानासाठी अक्षरशः भिक मागण्याची वेळ शासन, उर्जामंत्रालय आणि वीज कंपनी व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामूळे आल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोकणात भाजपची मोर्चेबांधणी

Success Story: इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; २५व्या वर्षी IAS झालेले प्रतिक जैन आहेत तरी कोण?

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT