Minor Girls Trafficked from Tribal Areas Saam tv
मुंबई/पुणे

आदिवासी मुलींची विक्री, लग्नाचे आमिष दाखवून सौदा; ठाणे अन् पालघरमधील भयंकर प्रकार उघड

Minor Girls Trafficked from Tribal Areas: ठाणे अन् पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींची विक्री. लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचं उघड. आरोपी ताब्यात.

Bhagyashree Kamble

  • लग्नाच्या नावाखाली विक्री.

  • आदिवासी अल्पवयीन मुलींचा छळ.

  • शासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी.

ग्रामीण भागात आदिवासी मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच ठाणे पालघर जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागात अल्पवयीन आदिवासी मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचं उघडकीस झालं. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात आले. तिची पन्नास ते सव्वा लाखापर्यंत विक्री करण्यात आली. लग्नानंतर तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ सुरू झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली.

मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी वाडा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू. तर, दुसरी घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची ७५ हजारात विक्री केली. तसेच तिला अहिल्यानगरात लग्न लावण्यासाठी घेऊन गेले.

तेव्हा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना कळवले. किन्हवली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, 'अल्पवयीन आदिवासी मुलींची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. ठाणे आणि पालघर भागातून हे प्रकरण उघडकीस आलं. लग्नाच्या नावाखाली एजंटद्वारे मुलींची विक्री केली जाते. या गोष्टीला आळा घालण्यासाठी शासनाने पावले उचलावीत', अशी मागणी विवेक पंडित यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

SCROLL FOR NEXT