Congress Saam TV
मुंबई/पुणे

BMC वाॅर्ड रचनेवरून काँग्रेसमध्ये नाराजी; कोर्टात जाण्याची केली तयारी

मुंबई महापालिका वाॅर्ड रचना करताना काँग्रेस नगरसेवकांना सर्वाधिक फटका बसल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) काल ३१ मे रोजी मुंबई महानगर पालिका (BMC ) निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असतानाच, आत मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेवरून काँग्रेस (Congress) कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

सध्याची वॉर्ड रचना करताना काँग्रेस नगरसेवकांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असून, काँग्रेस आता राज्य निवडणूक आयोगा विरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील पाहा -

राज्य निवडणूक आयोगानं मागील महिन्यामध्ये राज्यतील महापालिकांना (Municipal Corporation) निवडणुकांसदर्भात परिपत्रक जारी केलं होतं. यामध्ये महापालिकेच्या निवडणुकांपुर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील, असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं होतं. त्यानुसार राज्यातील महापालिकांनी आपापल्या परिक्षेत्रातील वॉर्ड रचना तयार करुन घेतल्या.

यामध्ये मुंबईमधील वॉर्ड रचनाही तयार करण्यात आली. मात्र, या वॉर्ड रचनेचा काँग्रेसला मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर असून, याच पार्श्वभूमिवर काँग्रेस वॉर्ड रचनेवरुन राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंधेरीत तक्रारींची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT