पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्ये फुट ! Saam TV
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्ये फुट !

ह्या लेटर बॉम्बची सध्या पिंपरी- चिंचवड शहारत जोरदार चर्चा सुरू आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी- चिंचवड: शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Japgtap) आणि महेश लांडगे (Mahesh Landage) हे मनमानी कारभार आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याची लेखी तक्रार सत्ताधारी भाजप पक्षातलेच तरुण नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारी पत्रात आमदारांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारचं खापर विरोधी पक्षावर फोडत असल्याने पक्ष बदनाम होऊन आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही कामठे यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. ह्या लेटर बॉम्बची सध्या पिंपरी- चिंचवड शहारत जोरदार चर्चा सुरू आहे.

तर आमच्या पक्षात कोणताही मला भेटणार नाही आमच्या पक्षातील सर्व पदाधिकारी समन्वयाने काम करतात असे सोयीस्कर उत्तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिलं आहे. तुषार कामठे यांनी हे पत्र आपली प्रसिद्धी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं असा दावा नामदेव ढाके यांनी केला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात जाहीर मेळावा घेत आमदार जगताप आणि लांडगे हे लूट करण्यासाठी मॉल उघडून बसले असल्याची गंभीर टीका केली होती.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या भारतीय जनता पक्षात आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची एक प्रकारे जणू मक्तेदारीच सुरू आहे. या दोन्ही आमदारांच्या मक्तेदारी विरोधात भाजपच्या अनके नगरसेवकांच्या मनामध्ये खद खद सुरू आहे. मात्र, कोणतेही नगरसेवक या दोन्ही आमदारां विरोधात साधं ब्र काढायला ही तयार होत नव्हते. मात्र तुषार कामठे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांच्या मनातील खद खदीला वाट मोकली करून दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT