न्यासा ब्लॅकलिस्टेड नाही; भरती प्रक्रिया पारदर्शकचं: राजेश टोपे

आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये झालेल्या गोंधळावरुन न्यासा कंपनीला विद्यार्थी आणि अनेकांनी घेऱ्यात घेतले.
न्यासा ब्लॅकलिस्टेड नाही; भरती प्रक्रिया पारदर्शकचं: राजेश टोपे
न्यासा ब्लॅकलिस्टेड नाही; भरती प्रक्रिया पारदर्शकचं: राजेश टोपेSaam Tv News
Published On

नाशिक: आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये झालेल्या गोंधळावरुन न्यासा कंपनीला विद्यार्थी आणि अनेकांनी घेऱ्यात घेतले. ब्लॅकलिस्टेड कंपनी असताना परीक्षेची जबाबदारी त्या कंपनीकडे का दिली असा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांनी उपस्थीत केला होता. यावर स्पष्टीकरण देताना राजेश टोपे म्हणाले ''न्यासा ही कंपनी ब्लॅकलिस्टेड नाही. ही परीक्षा न्यासाकडून घेण्यात येणार आहे''. आरोग्य विभागातील पुढील परीक्षा वेगवेगळ्या विभागाकडून न्यासाचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

न्यासा ब्लॅकलिस्टेड नाही; भरती प्रक्रिया पारदर्शकचं: राजेश टोपे
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार वाढ

न्यासाने मागील चुका सुधारल्या असल्याचं ठाम मत राजेश टोपे यांनी व्यक्तं केलं आहे. आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकचं असल्याचं टोपे म्हणाले. अनेक वर्षांनंतर प्रथमच आरोग्य विभागातील 100 टक्के नोकर भरती होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार परीक्षा द्यावी, एकाच वेळी सर्व परीक्षा येत आहेत, विद्यार्थ्यांनी ठरवावं कोणती परीक्षा द्यावी असे आवाहन राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, आरोग्या विभागाच्या गट क आणि गट ड विभागाच्या परीक्षा अचानक एक दिवस आधी पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी पालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. राज्य सरकारने त्वरीत परीक्षांच्या तारखा जाहिर कराव्या यासाठी आंदोलने देखील झाली. त्यानंतर राज्य सरकारने परीक्षेच्या तारखा जाहिर केल्या. पण पुन्हा काम न्यासा कंपनीकडेच देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com