Disha Salian Saam Tv
मुंबई/पुणे

Disha Salian Death Case:...तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू आणि याला जबाबदार हे असतील, पाहा दिशाची आई असं का म्हणाली?

याप्रकरणी आता खुद्द दिशाचे आई-वडील मीडियापुढे आलेत आणि त्यांनी विनंती केलीये की अशा प्रकारे त्यांना बदनाम करणे थांबवावं.

सुरज सावंत

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिशा सालियान (Disha Salian) चा उल्लेख केला. त्यानंतर एका वादाला तोंड फुटलं. मात्र, याप्रकरणी आता खुद्द दिशाचे आई-वडील मीडियापुढे आलेत आणि त्यांनी विनंती केलीये की अशा प्रकारे त्यांना बदनाम करणे थांबवावं. तसेच, जर हे असंच सुरु राहिलं आणि आम्ही आमचं काही बरंवाईट केलं तर त्याला जबाबदार राणे असतील, असंही त्या म्हणाल्या (Disha Salian Mother Vasanti Salian If They Do Anything Harmful To Them Then Rane Is Responsible for that).

आम्ही दररोज मरतोय - दिशाची आई

दोन वर्ष झाली या प्रकरणाला, ही केस बंद झाली आहे. तरीही आम्हाला त्रास दिला जात आहे. आम्ही दररोज मरतोय. खूप त्रास दिला जातोय. या आरोपांमुळे आम्हालाही जगण्यात अर्थ राहिला नाही. या पुढे आम्ही जरका काही बरंवाईट करुन घेतलं त्याला हे जबाबदार असतील, असं म्हणत दिशाची (Disha Salian) आई वासंती सानियाल अत्यंत भावूक झाल्या.

या घटनेमुळे आम्ही त्रस्त झालो होतो. घराबाहेर पडणंही बंद केलं होतं. आता कुठे सर्व पूर्वपदावर येत असताना पुन्हा याच गोष्टीचा इशू करुन माझ्या मुलीची बदनामी केली जात आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही हे कृत्य करण्याचा, याबाबत आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करत आहोत. यापुढे आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी केली.

'आम्हीही टोकाचं पाऊल उचलू याला जबाबदार हे असतील'

राणेंना विनती आहे, माझी एकुलती एक मुलीला मी गमावली आहे. माझी मनस्थिती समजून घ्या. जर आम्हाला अशाच प्रकारे बदनाम केलं, तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू याला जबाबदार हे असतील. जे आरोप केले जात आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. तिचा त्यादिवशी वाढदिवस होता. म्हणून पार्टीसाठी बोलावलं होतं. बाकी काहीही नाही. हे उगाच बदनाम केलं जात आहे. शवविच्छेदन अहवालात काहीही आलेलं नव्हतं. तिचं लग्न होणार होतं. त्यादिवशी तिच्या जवळचे मित्र तिच्यासोबत होते.ते कुणीही कुठेही गेलेले नाहीत. आजही बोलावलं तर ते ही समोर येतील.

'आता ती गेली पण आम्हाला आता जगू द्या'

कामाच्या तणावातून तिने आत्महत्या केली. तिने या कामाचा ताण माझाजवळ बोलून दाखवला होता. माझी हात जोडून विनंती आहे. आम्ही सर्वांना सहकार्य केलं आहे. जबाबही नोंदवले आहे. आता ती गेली पण आम्हाला आता जगू द्या, असंही त्या म्हणाल्या.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT