Disha Salian Death Case saam tv
मुंबई/पुणे

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, आर्थिक तणाव अन् वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या, पोलिसांचा रिपोर्टमधून दावा

Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणाला नवे वळण लागले आहे. वडिलांचे अफेअर, आर्थिक चणचणीतून दिशाने आत्महत्या केल्याचा रिपोर्ट पोलिसांनी नोंदवला आहे.

Namdeo Kumbhar

Disha Salian Case News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागले आहे. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचं समोर आले आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या अफेअरमुळे दिशा पैसे देऊन वैतागली होती. दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबाबत मित्रांनाही सांगितले होते. याच सगळ्या गोष्टीमुळे दिशा तणावात होती, त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याच मालवण पोलिसांनी निष्कर्षमध्ये म्हटले आहे.

प्रोजेक्टमध्ये झालेले नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना वारंवार पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे दिशा तणावात होती. दिशाने याबाबत मित्रांना सांगितले होते. दिशाच्या मैत्रिणींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, त्यामधून ही माहिती समोर आली आहे.पोलिसांनी ४ जून २०२१ रोजी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांना दाखवला होता, असेही समजतेय. दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र, आई वडिलांचे नोंदवल्यानंतर मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता.

मालवण पोलिसांनी तयार केलेले क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये राज्य सराकरने एसआयटीची बनवून तपास सुरू केला. राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा तपास अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, दिशा सालियन यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याची सुनावणी होणार आहे.

दिशा सालियनच्या मृत्यूला नवं वळण

मालवणी पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दोन प्रोजेक्ट हातातून गेल्याने आणि वडील पैसे मागत असल्याने तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नोंदवलाय. मित्रांचे जबाब घेऊन पोलिस या निष्कर्षावर पोहचले. ४ फेब्रुवारी २०२१ ला मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. जुन्या क्लोजर रिपोर्टमुळे दिशाच्या मृत्यूला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. मात्र सरकार बदलल्यानंतर नव्याने SIT ची स्थापना करण्यात आली होती. सरकार बदलल्यानंतर महा युतीच्या सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा रिपोर्ट मात्र वर्षाभराहून अधिक काळ प्रतीक्षेत आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT