Bombay High Court raises serious questions over Mumbai Police investigation in Disha Salian death case. saam tv
मुंबई/पुणे

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत; संशय असूनही गुन्हा का दाखल झाला नाही? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

Details Of Disha Salian Death Investigation And FIR Controversy Explained: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संशय असूनही गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल न्यायालयाने केला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असतानाही गुन्हा का नोंदवला गेला नाही आणि तपास का करण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला.

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने, "दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालानुसार ती १४व्या मजल्यावरून पडली असताना तिच्या शरीरावर गंभीर दुखापती का आढळल्या नाहीत?" असा प्रश्नही उपस्थित केला. दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाडमधील एका निवासी इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली होती. चौकशीनंतर पोलिसांनी हा मृत्यू आत्महत्या असल्याचा निष्कर्ष नोंदवला होता.

मात्र, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा स्वतंत्र आणि सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "प्रकरणाकडे केवळ अपघाती मृत्यू म्हणून पाहण्याऐवजी गुन्हा का नोंदवला गेला नाही? वडिलांनी संशय व्यक्त केला असतानाही तपास करण्यापासून पोलिसांना कोणी रोखले होते?" असा थेट सवाल केला. या सुनावणीमुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणातील तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT