Mumbai : डोंबिवलीत 'या' बॅनरची चर्चा..! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Mumbai : डोंबिवलीत 'या' बॅनरची चर्चा..!

भले केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजप मध्ये पटत नसले तरी आज सुद्धा डोंबिवलीत शिवसेना-भाजप पदाधिकारी हे एकमेकांच्या जवळ आहेत हे स्पष्ट होते.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत काही ठिकाणी लागलेल्या बॅनरची चर्चा आता जोरदार चालू आहे. उद्या भाजप पदाधिकारी आणि गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्वेला भाजपचे माजी नगरसेवक, उपमहापौर आणि सभापती राहुल दामले यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. मात्र, यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि लावलेल्या बॅनरची डोंबिवलीत चर्चा होऊ लागली आहे. 

हे देखील पहा :

शिवसेना-भाजप मध्ये युती तुटली आहे. शिवसेना-भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहे. तर केंद्रीयमंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सेना-भाजप कार्यकर्ते भिडले होते. कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमध्ये सुद्धा यावेळी शिवसेनेकडून त्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. हा निषेध करताना स्वतः शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. मात्र या दोघांनी पक्षीय मतभेत विसरत भाजपचे राहुल दामले यांना शुभेच्छा देत बॅनर लावल्याने चर्चा सुरू झाली आहे.

भले केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजप मध्ये पटत नसले तरी आज सुद्धा डोंबिवलीत शिवसेना-भाजप पदाधिकारी हे एकमेकांच्या जवळ आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि नागरिकांनी सुद्धा हे समजले पाहिजे की राजकीय कितीही वाद असला तरी तो प्रत्यक्षात नसतो आणि समाजसेवेसाठी पक्षीय वाद सोडून एकत्र यावे.

बॅनरवर काय शुभेच्छा दिल्या आहेत?

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी लावलेल्या बॅनर म्हटले आहे की 'मैत्री राजकारणाच्या पलिकडची,मित्रा तुला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन'.. तर नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी लावलेल्या बॅनर म्हटले आहे की 'मैत्रीचा सेतू असाच कायम राहू दे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT