Kirit Somaiya News Updates Saam TV
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: 'डर्टी डझन' लिस्टमध्ये आणखी 2 महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची नावे

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने सुरु केलेल्या कारवाईमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगल्याच प्रमाणात तापले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने सुरु केलेल्या कारवाईमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगल्याच प्रमाणात तापले आहे. तसेच केंद्र विरुद्ध राज्य असा सामना राज्यामध्ये सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच आता शिवसेना (Shiv Sena) नेते आणि मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाचे (Income tax department) पथक दाखल झाले आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Dirty Dozens list names 2 more leaders Mahavikas Aghadi government)

हे देखील पहा-

सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारच्या (government) डर्टी डझन नेत्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यात आणखी २ नावांचा समावेश करण्याचे मी विसरलो होतो. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar) यांचे नाव असल्याचे सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्याकरिता मी आज दिल्लीमध्ये विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले आहे. (Kirit Somaiya News Updates)

शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकार मधील अनेक बडे नेते रडावर आहेत.

यामध्येच महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस मधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे पुढील काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याचे सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेकरिता मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागाने छापा घातला आहे. सकाळी ६ वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.

दरम्यान, या पथकाबरोबर CISF पथक देखील असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेवर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिक याच्या अटके नंतर कोणाचा नंबर आहे? यावर किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पत्रकार विचारत असताना आता कुणाचा नंबर, पण त्याकरिता चिट्ठी काढावी लागणार आहे. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला अगोदर तुरुंगात पाठवायचे हे त्यांनीच ठरवावे, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईमध्ये केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT