Ukraine Russia War: रशियाबरोबर लढण्यासाठी आम्हाला एकटं पाडलं; युक्रेन राष्ट्राध्यक्ष

रशियाबरोबर दोन हात करण्याकरिता आम्हाला एकटे सोडण्यात आले आहे
Russia- Ukrain War
Russia- Ukrain WarSaam TV
Published On

वृत्तसंस्था: रशियाबरोबर दोन हात करण्याकरिता आम्हाला एकटे सोडण्यात आले आहे, असे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी यावेळी म्हटले आहे. झेलन्सकी यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडिओ (Video) मेसेज प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये रशियाच्या (Russia) हल्ल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी माहिती देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

झेलन्सकी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३१६ जण जखमी झाले आहेत. या युद्धामध्ये जगाकडून देखील युक्रेनला (Ukraine) मदत मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्याकरिता युक्रेनला एकट सोडण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आपल्या बाजूने लढण्याकरिता कोण उभे राहणार आहे? मला एक देखील देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाही.

युक्रेनला नाटोच सदस्यत्व देण्याची हमी कोण देण्यास तयार आहे? प्रत्येकजण घाबरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. राष्ट्रपती झेलन्सकी यांनी कीवमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे. रशियन फौजांनी राजधानी (Capital) कीवमध्ये प्रवेश केल्यास शहरामधील नागरिकांनी सतर्क रहावे आणि संचारबंदीचे पालन करावे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. आपण देश सोडून जाणार नसून कुटुंबीयांसह युक्रेनमध्ये राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Russia- Ukrain War
बीडच्या आष्टीत कत्तलखान्यावर छापा; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 आरोपींवर गुन्हा दाखल

रशियात युक्रेनमध्ये लष्कर घुसवल्यावर अमेरिका आणि अन्य नाटो (NATO) देश त्यांना मदत करणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या तरी युक्रेनचा एकाकी लढा सुरू असल्याचे दिसत आहे. नाटो देशांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवले नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी देखील अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिला आहे. परंतु, रशियाला जे मदत करणार आहेत त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, असा इशाराही बायडन यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com