पुणे : महापालिकेत 34 गावे आल्यानंतर पाणी कोटा वाढविण्याऐवजी उलट थेट कारवाई केली जात असल्याचा आरोप करत महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी केला असून पाणी कपात केल्यास आंदोलनाचा इशाराही महापौरांनी दिला आहे.
हे देखील पहा -
पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) महापालिकेसोबत 11.5 TMC पाण्याचा करार केलेला आहे. भामा आसखेड धरणामधून (Bhama Askhed Dam) पुण्याला सध्या 2.67 टीएमसी पाणी मिळत आहे. पाटबंधारे विभागाने भामा आसखेडमधून मिळणारे पाणी हे 111.5 टीएमसी यातील आहे तो अतिरिक्त कोटा नसल्यामुळे खडकवासला धरणातून वापरले जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करावे असं आधीच सांगितलं आहे.
शेतीसाठी पाणी टंचाई होऊ शकते -
महापालिका (Municipal Corporation) सध्या खडकवासला धरणातून 1460 एमएलडी आणि भामा खासखेड धरणातून 180 एमएलडी पाणी रोज वापरत असून जर याच पद्धतीने पाणी वापरले तर जून-जुलै महिन्यापर्यंत पाणी टंचाई होऊ शकते. शिवाय उन्हाळ्यात शेतीसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडावे लागणार असल्याने शेतीसाठी देखील पाणी टंचाई (Water scarcity) निर्माण होऊ शकते. तसेच महापालिकेला वारंवार सांगून देखील त्यांनी पाणी वापरावर नियंत्रण आणले नसल्याचं पाटबंधारे विभागाने पालिकेला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान पाटबंधारे विभागाने उत्तम नगर पोलिसांनाही पत्र पाठवून पोलिस बंदोबस्त द्यावा अशी विनंती देखील केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाकडून शुक्रवार पासून कपात केली जाणार असल्याने प्रशासनाची चांगलीच धावपउडाली आहे. पाटबंधारेच्या या पत्रावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, पाणी कपात केले तर धरणावर जाऊन आंदोलन करेन असा इशारा दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.