ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण नेहमीच घरामध्ये शोभेच्या वस्तू ठेवत असतो.
घरात नवीन वस्तू आणल्याने ते आपल्या घराची शोभा वाढवत असतात.
काही नागरिकांना घरात शोभेसाठी मूर्ती आणायला आवडत असते.
पण वास्तुनुसार घरात कोणती मूर्ती आणावी याचे काही खास नियम आहेात.
वास्तुनुसार घरात गायीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारत्मकता दूर होत असते.
वास्तुशास्त्रानुसार चांदीचा मासा धन आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. म्हणून घराच्या सुख शांतीसाठी ही चांदीचा मासा आणणे आवश्यक आहे.
आपल्या घरातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी घरात कासवाची मूर्ती आणा.
घरात उंटाची मूर्ती ठेवल्याने आपल्याला करिअरमध्ये आणि व्यवसायात यश मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल