नाशिकमध्ये रंगला सारस्वतांचा मेळा; संमेलनावरती पावसाचे सावट कायम (पहा Video)

साहित्य संमेलनालाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहणार नाहीत. मात्र नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
नाशिकमध्ये रंगला सारस्वतांचा मेळा; पावसाच्या सावटामुळे अनेक कार्यक्रम सभागृहातच
नाशिकमध्ये रंगला सारस्वतांचा मेळा; पावसाच्या सावटामुळे अनेक कार्यक्रम सभागृहातचSaamTV
Published On

नाशिक : अनेक दिवसांपासून विविध कारणांनी लांबलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अखेर नाशिकमध्ये आजपासून भरणार आहे. या साहित्याचा महाकुंभ ग्रंथ दिंडीची जय्यत तयारी केली असून दिंडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्यांची सजावट करण्यात आली आहे. तसेच थोर साहित्यक कुसुमाग्रजांच्या घरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ -

94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाला आजपासून नाशिकमध्ये (Nashik) सुरुवात होणार आहे. संमेलनाच्या परंपरेप्रमाणे कुसुमाग्रज यांचं निवासस्थान असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून थोड्याच वेळात ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी दिंडी मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला आहे. ग्रंथ दिंडीच्या पालखीलाही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पावसाचा फटका साहित्य संमेलनाला -

तसेच शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि साहित्य रसिक पारंपरिक पोशाखात या दिंडीत सहभागी झाले आहेत. दरम्यान अवकाळी पावसाचा (Rain) फटका साहित्य संमेलनालाही बसला आहे. अवकाळी पावसाच्या सावटामुळे संमेलनाच्या नियोजनात आयोजकांना काही बदल करावे लागलेत. अवकाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढण्यात येणाऱ्या ग्रंथ दिडींच्या मार्गात बदल करण्यात आला असून ग्रंथ दिंडीचा मार्ग कमी करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये रंगला सारस्वतांचा मेळा; पावसाच्या सावटामुळे अनेक कार्यक्रम सभागृहातच
खोकल्याच्या औषधाच्या ३६०० बाटल्यांसह तरूणाला अटक...

याआधी शहरातील कुसुमाग्रजांचं घर असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून निमाणीपर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार होती. ग्रंथ दिंडीचा मार्ग पाण्यानं स्वच्छ करून रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून ग्रंथ दिंडीचं स्वागत करण्यात येणार होतं. मात्र आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून सार्वजनिक वाचनालयापर्यंतचं ग्रंथ दिंडी नेण्यात येणार असून तिथून बसमध्ये ग्रंथ दिंडी साहित्य संमेलन स्थळी नेली जाणार आहे.

साहित्य संमेलन अध्यक्षांविना -

संमेलनाच्या उद्घाटनाला आजी-माजी संमेलनाध्यक्ष राहणार अनुपस्थित राहणार असल्याच समजत आहे. साहित्य संमेलनाला संमेलन अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर (Dr.Jayant Narlikar) प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नारळीकर संमेलनाला यावेत शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितलं आहे. तर मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटोही प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहणार गैरहजर मुख्यमंत्र्यांची संमेलनाच्या उदघाटनला ऑनलाईन उपस्थिती राहणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com