अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची डिनर डिप्लोमेसी SaamTvNews
मुंबई/पुणे

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची डिनर डिप्लोमेसी

भाजपमधील काही नाराज आमदारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न देखील यावेळी होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, काल विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत अधिवेशनात विविध मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या सर्व आमदारांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी संपूर्ण अधिवेशन काळात सरकारला कसे घेरायचे याचा मास्टर प्लॅन देखील आखला जाणार आहे. तसेच भाजपमधील काही नाराज आमदारांची नाराजी देखील दूर करण्याचा यावेळी प्रयत्न केला जाणार आहे.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे या अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांबरोबर विध्येयक मंजूर करतांना सत्ताधारी महाविकास आघाडीची कसरत असणार आहे. अधिवेशनाआधी आज 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. भरती परिक्षांमधील घोळ,प्रकुलपती नियुक्ती,एस टी कामगार संप, शक्ती कायदा या बरोबर विधान सभा अध्यक्ष पदाच्या होणाऱ्या निवडणुकी बाबत या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती रद्द करा मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

SCROLL FOR NEXT