Maharashtra News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra News : मोठी बातमी! दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयुक्त; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Maharashtra latest news : महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त आता दिनेश वाघमारे होणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Ganesh Kavade

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाचं बोललं जात आहे. दिनेश वाघमारे हे अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आता दिनेश वाघमारे होणार आहेत. ते अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. मंत्रीपरिषदेने निवडीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर दिनेश वाघमारे यांच्या शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केलेल्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलं.

कोण आहेत दिनेश वाघमारे?

आयएएस दिनेश वाघमारे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९४ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत २९ हून अधिक वर्षांपासून सेवा देत आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यातील महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.

त्यांनी १९९६ साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पुढे राज्यातील विविध विभागातील महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. वित्त, जमीन, उर्जा इत्यादी विभागातील अनेक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात पूर्ण केले आहेत.

शासनाच्या आदेशात काय म्हटलंय?

दिनेश वाघमारे हे २० जानेवारीपासून किंवा त्यानंतर त्यांचा कार्यालयात पदाचा कार्यभार घेतील. त्यांचा पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते ५ वर्षांकरिता पद धारण करतील. तसेच ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. आता त्यांच्यावर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याचे अधिक्षण, संचालन आणि नियंत्रण करणे याची जबाबदारी असणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यााची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक, अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्ग पूर्णत: बंद; VIDEO

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT