Devendra Fadnavis : जाहिरात एजन्सी, ६ रुपयांचं अर्धा लिटर पेट्रोल अन् अडीच लाखांचा चेक; CM फडवीसांनी सांगितला जुन्ना किस्सा

Devendra Fadnavis Latest News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सभेत बोलताना जुन्ना किस्सा सांगितला. यावेळी फडणवीस यांनी जुने किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला.
Devendra Fadnavis Latest News
Devendra fadnavis News saam
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : 'माझ्या विद्यालयीन जीवनात जाहिरात एजन्सी सुरु झाली. माझ्या घराच्या गॅरेजमध्ये ऑफिस सुरु झालं. तेव्हा कलर टिन जाहिरात काम आलं होतं. त्यामुळे एक लिटर पैसे भरायची सोय नव्हती. आम्ही अर्धा लिटर पेट्रोल भरून गेलो होतो. त्यावेळी आम्हाला अडीच लाखांचा चेक मिळाला, असा जुन्ना किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

Devendra Fadnavis Latest News
Devendra Fadnavis On ShaktiPeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला मुख्यमंत्र्यांची 'ताकद'; काम सुस्साट होणार, फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये!

'बनाये जीवन प्राणवाण' मुकुल कानिटकर लिखित द्वितीय आवृत्तीचे पुस्काचे प्रकाश सोहळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नागपुरातील सुरेश भट सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आय व्हीव इंटरप्राइजेज'चे विद्यालयीन जीवनात जाहिरात कंपनी सुरु झाली. माझ्या घरातील गॅरेजमध्ये याचं ऑफिस सुरु झाली. त्यावेळी त्यामागे मुकुल कानिटकर असायचे. कलर टिन शिटची जाहिरात करायचे काम आलं होतं. त्यावेळी मुकुल, ती जाहिरात केली होती'.

'आम्ही स्कुटरने गेलो होतो. त्यावेळी एक लिटर पैसे भरायची सोय नव्हती. त्यावेळी 12 रुपये लिटर पेट्रोल दर असताना अर्धा लिटर पेट्रोल भरून गेलो होतो. आम्हाला अडीच लाख रुपयांचा चेक मिळाला', असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis Latest News
Delhi Political News: बेरोजगारांना दरमहा ८,५०० रूपये मिळणार..निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी गॅरंटी जाहीर

'मित्रांचा मदतीने मला अनेक बाबी शिकायला मिळाल्या आहेत. यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहिले आवृत्तीचे प्रकाशन केले. आज मला दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याचा योग आला. आपले मूल्य पुनर्स्थापित करण्याचे काम मुकुल कानिटकर आणि प्राचीन विद्या समोर आणण्याचे काम पुस्तक प्रकाशनातून होत आहे. भारतातील इंग्रजांनी मोठा कालखंड डिलीट केला आहे. भारत समृद्ध होता. त्यामुळे धनवान होण्यासाठी लुटेरे भारतात येत होते भारतीय जीडीपी 28 टक्के होती, असे प्रतिमा होती.', फडणवीस यांनी सांगितले. d

Devendra Fadnavis Latest News
Devendra Fadnvis News | फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी संघाचे नेते फडणवीस यांच्या भेटीला

'आज उत्खनन होत आहे. हे सारी सभ्यता आहे. जो आमची सांस्कृतिक सभ्यता अवशेष मिळत आहे. हे विकसित सभ्यतेचे अवशेष मिळत आहे. विकसितनगर यातून मिळते. 9 ते 10 हजार वर्ष जुनी भारतीय सभ्यता आहे. भारतीय सभ्यता स्थापन झाली आहे. सातत्याने सिव्हिलाईज झालं. विकसित भारत होता राहिला आहे. सनातन आहे म्हणजे कधीही समाप्त न झालेलं आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com