मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेले आंदोलन त्यांनाच महागात पडलं आहे. या आंदोलनामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सदर आंदोलनामुळे मनसेचे संदीप देशपांडे देखील फरार झाले आहेत. भोंगे उतरवण्याच्या आंदोलनामुळे पोलिसांनी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पकडणे सुरु केल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील पाहा -
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आरोपीला शोधणं हे पोलिसांचे कामच आहे. पोलीस आपलं काम करत आहे. ज्या मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे. अन्यथा पोलिसांसमोर उपस्थित झाले पाहिजे.' पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना अतिरेकी असल्यासारखे शोधत आहे, या राज ठाकरेंच्या आरोपांनाही दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मनसे नेत्यांसोबत कशी वागणूक केली पाहीजे, याचे मार्गदर्शन राज ठाकरेंनी करावे, अशा शब्दात वळसे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. पुढे दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पोलीस कायद्याप्रमाणे आपलं काम करत असतात. त्यामध्ये काही चुकीचं नाही. पोलीस त्यांच्या पद्धतीनेच काम करणार. त्यामुळे कोणीही नाराज होण्याचे कारण नाही'.
दरम्यान, नागपुरात रेल्वे स्थानकावर ५४ जिलेटीन कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर गृहमंत्री वळसे पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'काल काही स्फोटकं रेल्वे स्टेशनवर आढळली आहे. त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणात अजून स्पष्टता आलेली नाही'. हरियाणा पोलिसांनी पकडलेल्या चार दहशतवाद्यांच्या नांदेड कनेक्शनवर देखील दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर वळसे पाटील म्हणाले की, पोलीस या प्रकरणावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. जे आरोपी सापडले आहेत, त्यांची कस्टडी महाराष्ट्र पोलीसांनी मागितली आहे'.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.