Devendra Fadnavis and Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? चर्चांना उधाण

रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावर जवळपास दोन तास खलबत झाली.

सुरज सावंत

मुंबई: पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यामध्ये एकमत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचं देखील समजतं आहे.

रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चांना रविवारपासूनच उधाण आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत कार्यक्रम असताना देखील ते या कार्यक्रमांना एकत्र आले नव्हते तेंव्हापासून या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मविआ सरकारमध्येही शिंदेचे याच मुद्यावरुन मतभेद -

राज्यातील पोलिस भरती हा राज्याच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या काळात देखील याच मुद्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT