पुणेकरांची पावसाने उडवली दैना, रात्रभरात १०४ मिलीमीटरची नोंद; आजही मुसळधार पावसाची शक्यता

दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर पावसाची शक्यता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.
Pune Rain Upates
Pune Rain UpatesSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे: काल राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने (Rain) हाहाकार घातला होता. अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. तर अवकाळी पावसामुळे शेतीचे देखील माठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर पावसाचा फटका शहरांना देखील बसला आहे.

पुणे शहरात (Pune City) काल रात्री ९ नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तारांबळ उडवली होती. विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या संततधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाहा व्हिडीओ -

२०२० नंतर २४ तासांच्या कालावधीत १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी रात्रभरात अर्थात १२ तासांत कदाचित ही दुर्मिळ घटना असावी. शिवाजीनगर येथील भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यापी यांनी सांगितलं की, माझ्या पाहण्यातील तरी एवढ्या कालावधीतील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे.

दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर पावसाची शक्यता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी रेनकोट किंवा छत्री तर सोबत बाळगावी, त्याच बरोबर पावसाचा अंदाज घेऊन दिवसभराच्या कार्यक्रमांची आखणी करावी असं आवाहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ऑक्टोबरमध्ये वाढतोय पाऊस -

Pune Rain Upates
Heavy Rain In Pune : पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप; वानवडीत कार गेली वाहून; पाहा VIDEO

शहरात गेल्या दहा वर्षांपूर्वी (२०१२) ऑक्टोबरमध्ये १४४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली. त्यानंतर ४ वर्षांमध्ये (२०१६पर्यंत) एकदाही या महिन्यात १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाही. पण, २०१८चा अपवाद वगळता दोनशे मिलीमीटरपेक्ष जास्त पाऊस हवामान खात्यात नोंदला गेला.

२०१९ मध्ये २३५ मिलीमीटर आणि २०२० मध्ये ३१२ मिलीमीटर पाऊस या एका महिन्यात पडला. या महिन्यातील १४ दिवसांमध्ये १५२.७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे शहरात सातत्याने ऑक्टोबरमधील पाऊस वाढत असल्याचा निष्कर्ष हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून निघाला. २०२०, २०१७ आणि २०११ मध्ये एका दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील पावसाची नोंद (२४ तासांमध्ये पडलेला पाऊस)

वर्ष : तारीख : पाऊस मिलिमीटरमध्ये

२०२२ : १५ ऑक्टोबर : ७४

२०२१ : १० ऑक्टोबर : ५५.३

२०२० : १५ ऑक्टोबर : ११२.१

२०१९ : ५ ऑक्टोबर : ४३.८

२०१८ : २ ऑक्टोबर : १६

२०१७ : १४ ऑक्टोबर : १०१.३

२०१६ : २ ऑक्टोबर : ३१.६

२०१५ : १२ ऑक्टोबर : २९.३

२०१४ : २ ऑक्टोबर : ८.१

२०१३ : १६ ऑक्टोबर : १६.१

२०१२ : २ ऑक्टोबर :३७.७

२०११ : १२ ऑक्टोबर : १०५.१

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com