Pune BJP Saam Tv
मुंबई/पुणे

Pune BJP: पुण्यात धीरज घाटे तर पिंपरी-चिंचवडमध्ये शंकर जगताप भाजपचे नवे शहराध्यक्ष

Shivani Tichkule

Pune News Today: भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. यावर नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की गेली ३० ते ३२ वर्ष झाली ज्या विचारधारेचा काम करत आहे. त्याच्या शहराध्यक्ष पदी निवड झाल्याने खूप आनंद होत आहे. (Latest Marathi News)

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थितीती पाहता पुढील येणाऱ्या वर्षात होऊ घातलेल्या महापालिका,विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी,शिवसेना आणि आम्ही तिघेजण मिळून मोठ्या ताकदीने लढणार आहोत आणि येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचं यावेळी घाटे यांनी सांगितल.

पिंपरी-चिंचवडमध्ये शंकर जगताप भाजपचे नवे शहराध्यक्ष

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष बदलण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या ऐवजी आता शंकर जगताप यांची भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शंकर जगताप यांची भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महेश लांडगे यांचा पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा कार्यकाल मागील काही महिन्यापूर्वी पूर्ण झाल्याने, पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष बदलण्यात यावा अशी मागणी मागील काही महिन्यापासून जोर धरत होती.

त्यासाठी भारतीय जनता पक्ष अंतर्गत शंकर जगताप यांच्यासोबत राजेश पिल्ले आणि इतर काही पदाधिकाऱ्यांची नाव चर्चेत होती. मात्र अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड विधानसभा चे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत लक्ष्मण जगताप प्रमाणेच शंकर जगताप यांच्यावर देखील शहरातील राजकारणातील मोठी जबाबदारी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT