Mumbai Building Slab Collapse: पावसामुळे भांडुपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Rain Alert: भांडुपच्या सोनापूर भागामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

Mumbai News: मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे भांडूपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Building Slab Collapse) घटना घडली आहे. या घटनेमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भांडुपच्या सोनापूर भागामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) ही माहिती देण्यात आली आहे.

Crime News
Raigad Rain News : सावित्री, गांधारी, काळ नदीने ओलांडली धोक्याची पातळी; रायगड जिल्ह्यात NDRF चे विशेष पथक दाखल (पाहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भांडुपच्या सोनापूर भागात असलेल्या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. भांडुपच्या क्रॉस रोडवरील झाकेरिया इमारतीमध्ये ही घटना घडली. चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक १०२ मध्ये राहणारी ५ वर्षांची मुलगी तसीन शेख ही गंभीर जखमी झाली.

Crime News
Mumbai Train Update : मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकलसेवा विस्कळीत, पनवेल ते बेलापूर वाहतूक ठप्प; मध्यरेल्वे १५ मिनिटं उशिराने

जखमी झालेल्या तसीन शेखला तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी नजीकच्या एस आर सी रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तसीनच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे शेख यांच्या प्लॅटचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे स्लॅब कोसळला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास भांडूप पोलिसांकडून सुरु आहे.

Crime News
Maratha Aarakshan News: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

दरम्यान, मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी साचल्यामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा (Mumbai Local) विस्कळीत झाली आहे. त्याचसोबत मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशामध्ये मुंबईत येत्या ५ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com