Mantralaya News Saam tv
मुंबई/पुणे

Mantralaya News : मोठी बातमी! आमदारांनंतर आता मंत्रालयाच्या इमारतीवरून धनगर आंदोलकांच्या उड्या

मुंबई : आदिवासी आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांनी मंत्रालयीतील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणुकीआधीच धनगर आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. धनगर आंदोलकांची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी आहे. या मागणीसाठी धनगर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना घडली आहे. आंदोलकांनी उड्या मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.

काही दिवसांपूर्वी आदिवासी (Tribe) आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. यामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही समावेश होता. या आदिवासी आमदारांचा धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून देण्यास विरोध आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासहित विविध मागण्यासाठी आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. त्यानंतर आता धनगर समाजाच्या आंदोलकांनी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना समोर आली आहे.

आदिवासी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत धनगर आंदोलकांनी संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. धनगर आंदोलकांनी जाळ्यावर उड्या मारल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. त्यानंतर काही आंदोकांनी मंत्रालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.

मंत्रालयाच्या आवारात धनगर आंदोलकांनी आवारात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. धनगर आंदोलकांनी (Dhangar Reservation) मंत्रालयातील जाळ्यावर उड्या मारल्याने आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द केलं होतं. राज्यात धनगड समाज नसतानाही ७ जणांना धनगड जातीचे दाखले देण्यात आले होते. हे दाखले रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने हे दाखले रद्द केले. त्यामुळे धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असं बोललं जात आहे. याचदरम्यान, धनगर आंदोलकांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारत आंदोलन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: महागडे फेशियल न करताही तुमचा चेहरा दिसेल क्लीन आणि ग्लोईंग; फॉलो करा या सोप्या टिप्स

पुण्यात गँगवॉर! आंदेकर टोळीतील दत्ता काळेच्या भावावर गोळीबार; गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानं हल्ला

Allu Sirish Engagement : अल्लू अर्जुनच्या घरी लगीन घाई, भावाचा थाटात पार पडला साखरपुडा

Maharashtra Tourism: धुक्याची चादर, डोंगररांगा आणि रोमँटिक वातावरणात वेळ घालवायचाय? पाहा महाराष्ट्रातील कपल्ससाठी बेस्ट स्पॉट्स

Rohit Arya Encounter: रोहित आर्याच्या एन्काऊंटरबाबत पोलीस फिर्यादीतून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT