dhananjay munde, eknath shinde, pimpri chinchwad
dhananjay munde, eknath shinde, pimpri chinchwad saam tv
मुंबई/पुणे

Chinchwad By Election : 'उद्योग, ज्योतिर्लिंग गेले आता पंढरीचा विठ्ठल गेला तर हे म्हणतील तिरुपती आणून देऊ'

गोपाल मोटघरे

Chinchwad By Election : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (ncp president sharad pawar) आणि अजित पवार (ajit pawar) यांचं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (laxman jagtap) यांच्या डोक्यावर जोपर्यंत हात होता, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लक्ष्मण जगताप यांचा राजकीय उत्कर्ष झाला होता. ते भारतीय जनता पक्षात (bjp) गेल्यावर त्यांची राजकीय कारकिर्द बहरली नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे (nana kate) यांच्या प्रचारार्थ सभेत मुंडे बाेलत हाेते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली.

धनंजय मुंडे म्हणाले भारतीय जनता पक्षाने पिंपरी चिंचवडचा विकास नव्हे तर हे शहर भकास केले. यापुर्वी लक्ष्मण भाऊ आपल्या पक्षात हाेते तेव्हा त्यांची राजकीय कारकिर्द बहरत हाेती. परंतु भाजपात गेल्यावर त्यांची राजकीय कारकिर्द बहरली नाही असेही मुंडेंनी नमूद केले. (Maharashtra News)

मुंडे म्हणाले केंद्रातील भाजप सरकारने आज महाराष्ट्रातील उद्योग आणि ज्योतिर्लिंग पळवली, उद्या हे सरकार पंढरपूरचा विठ्ठल पळवतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील विठ्ठल गेला तर काय झाल, मी तुम्हाला तिरुपती आणून देतो अशी मार्मिक टीका देखील धनंजय मुंडे यांनी प्रचार सभेत केली. या सभेस मविआचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT